एका सरड्याने इतके रंग बदलले...

मित्राने सरड्या वरील एक कविता मेल केली अन वाचून जी ए ची मानससरोवरावरील कावळ्यांची गोष्ट आठवली ज्यात जी ए जीवनाचं एक सूत्र सांगतात. स्वसंरक्षणाच्या संदर्भात तात्विक स्वर या पेक्षा हि व्यावहारिकता ही जास्त कामी येते हाच तो काय दोन्ही ठिकाणी संदेश.

एका सरड्याने इतके रंग बदलले...

एका सरड्याने इतके रंग बदलले
की त्याला स्वत:चा खरा रंग कळेना
त्याने खूप विचार केला तरी
तो कसा होता ते
त्याला काही केल्या आठवेना

तो म्हणाला,"मी आकाशाला निळा वाटतो
मी गवताला हिरवा वाटतो
मी सर्वांना त्यांच्यासारखाच वाटतो
मी खरा कसा ते, कोणाला कळतं
वेगळा आहे ते कोणाला कळतं"

मग त्याने एकच रंग ठेवायचं ठरवलं
एकाच रंगाला त्याचा खरा रंग मानलं

गवतावरच नाही तरमातीवर पण तो रहायला लागला हिरवा
त्याला काही खोडकर मुलांनी
मातीवर ओळखलं परवा

त्यांना या खऱ्या रंगाने
त्याचा वेगळेपणा दाखवला
आणि या खऱ्या रंगामुळे
त्या मुलांनी त्याला दगड मारून संपवला

सरडा मेला तरी
लोकांना जिवनाचा नियम कळावा
चार-चौघात गेल्यावर आपणत्यांच्याप्रमाणे रंग बदलावा
कितीही वाईट वाटलं तरीआपला खरा रंग लपवावा
कारण हे जग वेगळेपणाला घातक मानतं
आणि मग स्वत:च घातक बनून
आपल्याला आपला रंग बदलायला लावतं

No comments: