पुणे आणि पुणेकर

पुण्यातल्या तऱ्हेवाईकपणा बद्दल पुणेकरांना नेमीच भरभरून बोलाव अस वाटत. नेहमीचच रुटीन जगतांना त्यांना त्यांच्या तऱ्हेवाईकपणा बद्दल बोलायचा डोस सतत हवा असतो. बऱ्याच वेळेस हा तऱ्हेवाईकपणा ते उसना आणतात. कधी कधी तर तो फारच कृत्रिम वाटतो.

जेव्हा ओरिजिनल विक्षिप्त लिखाण असलेल्या पाट्या दिसेनास्या होतात तेव्हा पुणेकर उगाच तसल्या पाट्या मेल करून उसना पुणेकरी पणा आणतात.

जगात जसे लंडनवासीय स्वतःला फारच श्रेष्ट समजतात किवा न्यूयॉर्क वासियांना सतत वाटत कि त्याचं च शहर सर्व श्रेष्ठ तसाच काहीसा प्रकार भारतात पुणेकरांबद्दल आहे.

अरुण टिकेकरांनी सांगितल्या प्रमाणे लोकांमध्ये असलेला तऱ्हेवाईकपणा हा कुठल्याही समाजाला पोषकच असतो. तऱ्हेवाईक लोक च प्रवाहाच्या विरुद्ध विचार करतात आणि ते विचार आचरणात आणतात. या तऱ्हेवाईकपण मुळे जीवनात सुद्धा एक थ्रील येत.

पुण्यात एकेकाळी असे तऱ्हेवाईक लोक खूप होऊन गेलेत आणि म्हणून च पुण्याने बऱ्याच चळवळींचे नेतृत्व केले.

पण आज हा उसना तऱ्हेवाईकपणा समाजाला, किंबहुना पुण्याला कुठे घेऊन जाईल ?

2 comments:

Anonymous said...

लोकानी पुण्याची मुंबई केलि , याबद्दल कदाचित खरा पुणेकर हळहळला म्हणुन कदाचित हा उसनवार प्रयत्न असेल........


पुणेकर

Anonymous said...

लोकानी पुण्याची मुंबई केलि , याबद्दल कदाचित खरा पुणेकर हळहळला म्हणुन कदाचित हा उसनवार प्रयत्न असेल........


पुणेकर